सांजसोबती सेवालय

समाजातील दुर्लक्षित व निराधार वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित एक पाऊल... त्यांचा आधार बनूया.

संस्थेची ओळख

सांज सोबती सेवालय, पेठ

ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून समाजातील दुर्लक्षित व निराधार वृद्धांच्या सेवेसाठी समर्पित आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीतील अनेक वृद्ध आई-वडील एकटे पडत आहेत.

त्यांच्या आयुष्यात आधार आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी सांजसोबती सेवालयाची स्थापना करण्यात आली आहे. आमची संस्था कोणासाठी नफा न पाहता केवळ समाजाच्या आणि समाजसेवेच्या भावनेतून कार्यरत आहे.

About Sanjsobati Sevalay

संस्थेचा उद्देश

सुरक्षित निवारा

निराधार वृद्धांना सुरक्षित आणि हक्काचा निवारा देणे.

आरोग्य व काळजी

त्यांचे आरोग्य, अन्न व दैनंदिन गरजा पूर्ण करणे.

मानसिक आधार

त्यांना मानसिक आधार व प्रेम देणे, त्यांच्या जीवनात आनंद आणणे.

समाज प्रबोधन

समाजात वृद्धांबद्दल संवेदनशीलता वाढवणे.

आमची मुख्य मूल्ये

माणुसकी

पारदर्शकता

सेवा

विश्वास